



🔸पत्रकार शाम अडागळे यांचाच कार्यक्रम तर करायचा नाही ना ?
🔹डीवायएसपी साहेब आरोपीला अटक करा
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.11फेब्रुवारी):- ०५ शनिवार रोजी कचरू वक्ते यांनी पत्रकार शाम अडागळे यांना राशन च्या बातम्या का लावतो म्हणत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती या संदर्भात अडागळे यांनी तलवाडा पोलीस स्टेशन येथे ५०४,५०६, व कलम ४ पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दि ६/२/२०२२ रविवार रोजी गुन्हा दाखल केला असताना आता कचरू वक्ते यांचा पुतण्या अभय कल्याण वक्ते यानी फेसबुक पोस्टद्वारे आमच्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच वेट अँड वॉच अशी पोस्ट केली आहे.
ही पोस्ट पत्रकार शाम अडागळे यांचाच कार्यक्रम करण्यासाठी तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे आरोपी कचरू वक्ते व अभय वक्ते हा राशन दुकान क्र.२ या राशन दुकानदाराचे नातेवाईक आहेत त्यामुळे अडागळे यांच्या जीवितास धोका असल्याची दाट शक्यता आहे. सिरसदेवी फाटा येथे पाच ते सहा गुंड प्रवतीच्या मुलांना घोळक्याने घेऊन बसने ,रागाने बघणे अशा प्रकार घडत आहे त्यामुळे अडागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच तलवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन पाच दिवस होत आहेत तरीही अजून आरोपी अटकेत नाही त्यामुळे मा. उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी आरोपी कचरू वक्ते याला लवकरात लवकर अटक करून अभय वक्ते याच्यावर कायदेशीर कारवाई करावी येणाऱ्या काळात अडागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तर या हल्ल्यात त्यांचा कार्यक्रम झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी राशन दुकानदार व अभय वक्ते यांची राहील असा तक्रार अर्ज बीड जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यलय बीड अडागळे यांनी दिला आहे.


