Home महाराष्ट्र भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -विवीध कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -विवीध कार्यक्रमाचे आयोजन

271

🔹”फिट इंडीया स्कुल वीक” साजरा करणेबाबत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11फेब्रुवारी):-भारताच्या स्वातंत्र्याचा दिनांक 15 ऑगष्ट 2021 रोजी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे.या गौरवशाली पर्वानिमित्त, केंद्र शासनाने आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , दिनांक12 मार्च 2021 पासून 75 आठवडे या कालावधीत देशभरात विवीध कार्यक्रम/ उपक्रमाव्दारे आयोजित करणेबाबतसुचित केले आहे. त्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यास मान्यता दिलेली आहे.तसेच सदर कार्यक्रम माहे ऑगष्ट 2023 पर्यंत आयोजीत करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे.

सदर उपक्रमामध्ये फिट इंडीया फ्रीडम रन अंतर्गत फिट इंडीया फ्रीडम रन चे आयोजन करण्यात यावे. रन करीता अंतर किमान 2 किलोमिटर असावे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस ) व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)यांच्या सहकार्याने उक्त कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करून,उपक्रमामध्ये सहभागी करून कार्यक्रमाची व्यापकता वाढवावी. उदा. गडकिल्ले, क्रीडा संकुले साफसफाई इत्यादी व महीलांमध्ये स्वसंरक्षण विषयक जागृकता निर्माण करण्यासाठी सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालय स्तरावर स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आयोजित करण्यात यावी. तसेच सर्व शाळां/महाविद्यालयामध्ये फिट इंडीया स्कुल विक साजरा करण्यात येवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड हे कळवितात.
*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here