



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.11फेब्रुवारी):- येथील वेकोली वसाहतीच्या इंदिरानगर क्वार्टर क्र.डीएस/एमक्यू १७७ मध्ये राहनारे राजम हनमंतू कोंकटवार (५५) वेकोली कर्मचारी यांच्या क्वार्टरला शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी (१) एक वाजता दरम्यान शॉक सर्किट मुळे अचानक आग लागली.घरी कुणीच नसल्याने अचानक आग लागताच घरातुन आगीचा धूर निघु लागल्याने शेजारील नागरिकांनी बघितले हि माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, पं.स.माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे संजय तिवारी,मल्लेश बल्ला,शरद गेडाम यांनी घटनास्थळावर धाव घेतली.घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
भाजयुमोचे उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ही माहिती ए.सी.सी.कंपनीच्या अग्निशमन दलास दिली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीत घरातील टिव्ही, फ्रिज, संगणक, एसी,बेड,सोफासेट, कागदपत्र व जीवन आवश्यक वस्तु असे अनेक साहित्य संपूर्ण राख झाली.*अंदाज ३० लाखाचे नुकसान झाले आहे*याप्रसंगी शेजारीचे श्रीकांत नुने,धिरज पिट्टलवार, विनय कन्नूरी,आदित्य वैध, ओम गुप्ता यांनी युध्दपातळीवर काम केले, मदत कार्य निरंतर घरातील सामान बाहेर काढले.अग्नीशमन दलाने पाण्याचा मारा करून आटोक्यात आनली,घग्घुस परिषद व वेकोलीने अग्नीशमन दलाच्या वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी माजी पंचायत समितीचे उपसभापती निरीक्षण तांड्रा रेटून धरली.


