Home महाराष्ट्र शहजानपुर चकला अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात स्थानिक ग्रामविकास यंत्रणेतील, महसुल व पोलीस प्रशासनातील...

शहजानपुर चकला अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात स्थानिक ग्रामविकास यंत्रणेतील, महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करा, चौकशी समितीतील वादग्रस्त आधिका-यांची हकालपट्टी करा

101

🔸गेवराई, बीड, शिरूर (कासार )तालुक्यातील नदीपात्रात मोठ्याप्रमाणात अवैध उत्खनन

🔹जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतरही ६-८ महिने उपविभागीय आधिकारी, तहसिलदार अहवाल सादर करत नसल्याचे माहिती आधिकारात उघड :-डाॅ.गणेश ढवळे

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.11फेब्रुवारी):-तालुक्यातील शहजानपुर चकला येथील अवैध वाळुउपश्यामुळे नदीपात्रातील खड्ड्यात ४ अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात वाळुमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याघटनेस जबाबदार स्थानिक ग्रामविकास यंत्रणेतील आधिकारी, महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत त्याच बरोबर वादग्रस्त आधिका-यांची पारदर्शक चौकशीसाठी हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कारकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, संदिप जाधव, अशोक कातखडे,यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव महसुल व वनविभाग, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना देत दि.१४ फेब्रुवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

वादग्रस्त आधिका-यांची चौकशी समितीतुन हकालपट्टी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा
___
बीड, गेवराई, शिरूर (कासार)तालुक्यातील उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर, राठोड तहसिलदार सचिन खाडे, सुरेंद्र डोके, श्रीराम बेंडे आदि वाळुमाफियांवर मेहेरबान वादग्रस्त आधिका-यांची चौकशी समितीतुन हकालपट्टी करण्यात येऊन त्यांची व त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी ज्यामुळे पारदर्शकपणे चौकशी करून न्याय मिळेल.

गेवराई, बीड, शिरूर (कासार )तालुक्यातील नदीपात्रात मोठ्याप्रमाणात अवैध उत्खनन
___
गेवराई तालुक्यातील शहजानपुर चकला, तांदळवाडी, राक्षसभुवन, माळस पिंपळगाव, सुरळेगाव आदि गावातील गोदावरी पात्रातील तसेच बीड तालुक्यातील खुंड्रस, आडगाव, कुक्कडगाव, रंजेगाव, नाथापुर आदि गावातील सिंदफणा नदीपात्रातील तसेच शिरूर (कासार )तालुक्यातील निमगांव (मायंबा)नांदेवाली, माळेवाडी,नारायणवाडी शिवारातील सिंदफणा नदीपात्रातील अनाधिकृत वाळु उत्खनन सध्या मोठ्याप्रमाणात सुरूच आहे.

जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतरही ६-८ महिने उपविभागीय आधिकारी, तहसिलदार अहवाल सादर करत नसल्याचे माहिती आधिकारात उघड :-डाॅ.गणेश ढवळे
___
अवैध वाळु उत्खनन प्रकरणात पुराव्यासह जिल्हाधिकारी बीड यांना सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन, तक्रार, आंदोलनानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी संबधित उपविभागीय आधिकारी व तहसिलदार यांनी चौकशी करून नियमानुसार कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन ६-८ महिने झाले तरी अहवाल देण्यात आला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखी माहीती आधिकारात उघड झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here