Home महाराष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

276

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11फेब्रुवारी):-गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात दिनांक १० फेब्रुवारीला शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या निर्देशानुसार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उदय मेंडूलकर यांनी सूर्यनमस्काराचे प्रदर्शन करून विद्यार्थांना मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देत बारा नावाची माहिती सांगितली. तसेच आरोग्य संपन्न जीवन जगताना दैनदिन जीवनात व्यायाम हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. सूर्यनमस्कार हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे. सूर्यनमस्काराला संपूर्ण व्यायाम समजले जाते. सूर्यनमस्कार सतत केल्याने शारीरिक सुदृढता प्राप्त करता येते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी सूर्यनमस्काराचे विविध फायदे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. पितांबर पिसे यांनी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होत असलेल्या अमृत महोत्सवा विषयी माहीती सांगितली.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉ. हरेश गजभिये, प्रा. प्रफुल राजुरवाडे, डॉ. नितीन कत्रोजवार, डॉ. राजेश्वर रहांगडले, प्रा. आशुतोष पोपटे, डॉ. लक्ष्मन कामडी, प्रा. निखील पिसे आदीने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here