



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.11फेब्रुवारी):- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या दृष्टीने आजपासून जिल्ह्यात मनाई आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत. या दरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून या काळात शस्त्र बाळगणे, आंदोलन करणे, मोर्चे काढणे,भडकावू भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी हे आदेश जारी केले असून अप्पर जिल्हाधिकारी संतोष बनकर यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून, जिल्हाधिकारी शर्मा यांनी आजपासून येणाऱ्या 24 फेब्रुवारीपर्यंत, जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
दरम्यान मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.या दरम्यान शस्त्र, काठी, तलवार, बंदूक, दाहक पदार्थ जवळ बाळगण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषण करणे त्याचबरोबर आंदोलन,मोर्चे , रस्ता रोको करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आदेश मोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा देखील देण्यात आला आहे.


