Home महाराष्ट्र समाज जर संघटित करायचे असेल तर गोर बंजारा समाजाने संत सेवालाल महाराज...

समाज जर संघटित करायचे असेल तर गोर बंजारा समाजाने संत सेवालाल महाराज जयंती १५ फेब्रुवारीलाच करावी—पत्रकार विष्णु राठोड

57

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

तलवाडा(दि.10फेब्रुवारी):- गोर बंजारा समाजाचे संत म्हणुन ओळखले जाणारे सतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३ ९ रोजी झाला . म्हणून आपण दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करतो . समाज संघटित करण्यासाठी व समाज सेवा करण्यासाठी गोर बंजारा समाजामधे खूप काही संघटना तयार झाल्या आहेत . आणि त्या संघटना समाजासाठी खूप चांगल काम पण करीत आहे . गेल्या वर्षी काही दिनदर्शिका मध्ये १५ फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज जयंतीचा उल्लेख न केल्याने समस्त गोर बंजारा समाजाने व समाजातील काही संघटनेने जाहीर निषेध दाखवला होता . हे अगदी योग्यच आहे पण त्यांनाही आपण दाखवून देऊ की गोर बंजारा समाजाचे संत सतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती आपण किती उत्साहाने साजरा करतो.

कधी कळेल जेव्हा आपल्या सर्व संघटना एकत्र येऊन १५ फेब्रुवारीलाच संत सेवालाल महाराज यांची जयंती साजर करू तेव्हा . गोर बंजारा समाजातील काही संघटना आपल्या | प्रसिद्धी साठी व आपल्या फायद्यासाठी फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या तारखेला जयंती साजरी करतात . जयंती मागे आपला कोणताही फायदा न पाहता गोर बंजारा समाज जर संघटित करायचे असेल तर आपल्याला संत सेवालाल महाराज यांची जयंती ही १५ फेब्रुवारीलाच सर्वांनी एकत्र येऊन करावी असे पत्रकार विष्णु राठोड यांची विनंती आहे . व दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी सर्वांनी जयंतीत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा .

Previous articleगंगाखेडला कॉंग्रेसचे भाजपा कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन
Next articleधार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here