Home महाराष्ट्र आमदार ससाने यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

आमदार ससाने यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

131

🔺पुढील सुनावणी दि.11 फेब्रुवारी रोजी होणार

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10फेब्रुवारी):- न.प.च्या 65 लाखाच्या भ्रष्टाचार प्रकरणी भाजपा आमदार नामदेव ससासे यांनी अंतरींम जामिन अर्जा साठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती.स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम 58 (2) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती.

सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता.
यावर नगर विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.त्यावरून आज सोमवारी उशिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उमरखेड नगरपरिषदेच्या कचरा संकलन घोटाळ्यात नगराध्यक्ष नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार फिरोजखान आजाद खान, मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे यांच्यासह लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव असे एकूण अकरा जणांविरुद्ध कचरा संकलन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळल्या चे नगर विकास मंत्रालय आदेशात म्हटले होते.

यावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर संबंधितांवर पोलिसात तक्रार देण्याची जबाबदारी दिली होती.यावरून मुख्याधिकारी यांनी 6 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.या तक्रारीवर ठाणेदार अमोल माळवे यांनी दस्तऐवजाची पडताळणी करून दि. 7 फेब्रुवारी रोजी भादवी 420, 409, 465, 467, 468, 471, 34 नुसार कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधिकारी सुजाता बनसोड यांच्या कडे सोपविण्यात आला आहे. त्यानंतर आमदार नामदेव ससाने यांनी अंतरींम जामिना साठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली.त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायालय पुसद येथे सुनावणी घेत न्यायालयाने अंतरींम जामिन अर्ज फेटाळला.व या प्रकरणी पुढील सुनावणी दि.11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तरी या प्रकरणाकडे उमरखेड शहर तसेच तालुक्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here