



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.10फेब्रुवारी):-माण पंचायत समितीच्या सभापती पदाचा अपर्णा सोमनाथ भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र आज ठरल्याप्रमाणे जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक कार्यकर्ते डंगीरवाडीचे हरिभाऊ जगदाळे यांच्या पत्नी सौ. रंजना हरिभाऊ जगदाळे यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्या यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सभापती पदाला आमदार पदाएवढी किंम्मत असायची. पंचायत समितीच्या कोणत्याही गनातून निवडून आले तरी सभापती पदासाठी खूप मोठी कसरत करावी लागत होती.पण आता मात्र त्या पदाची किंम्मत च संपली की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत.आता सध्या कोणत्याही गणातुन निवडून या सभापती व्हा अशी प्रथा गेल्या दोन वर्षांपासून सुरु झाली आहे.
माण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या खुर्चीची चेष्टा सुरु आहे की काय असे चर्चा सगळीकडे जोर धरू लागली आहे. सभापती पदाची खुर्ची म्हणजे जणू संगीत खुर्ची असल्यासारखेच झाले आहे.





