




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.9फेब्रुवारी):-जिल्ह्य़ातील विविध विभागातील विकासकामे लोकप्रतिनिधींकडून उद्घाटनाच्या अट्टहासापायी रखडलेली असून केवळ राजकीय श्रेयवादातुन कामांना विलंब होत असून त्यामुळे नागरीकांच्या अडचणीत भर पडत असुन निवडणूक पुर्व कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येत नसुन राजकीय कार्यकर्ते यांना निवडणूक खर्च निधी या स्वरूपात थातूरमातूर कामे उरकण्यात येतात.
यासंबधी पुराव्यासह तक्रार, निवेदन, आंदोलन तसेच विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध होऊन सुद्धा जिल्हाप्रशासन जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ करत असून जनतेच्या पैशाची लुट होत असुन लोकप्रतिनिधींकडून उद्घाटनाचा अट्टहास व जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिका-यांची निकृष्ट कामात कारवाई करण्याची उदासिनता यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर ,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे आदि आंदोलनात सहभागी होते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणार्थी जनसामान्याकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “नारळ फोडो आंदोलन करण्यात आले.4




