Home महाराष्ट्र 21 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

21 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

45

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.9फेब्रुवारी):- जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला आयोजित करण्यात येते. या महिन्यात महिला लोकशाही दिन दिनांक 21 फेब्रुवारी 2022, रोज (सोमवार)सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहीत नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल.

तालुक्यास्तरावरील महिला लोकशाही दिन हा प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारला आयोजित केल्या जातो त्याकरीता अर्जाचा नमुना तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयात निशुल्क प्राप्त होईल व तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीच्या टोकन नंबरशिवाय जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात अपील अर्ज स्विकृत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली, बॅरेक क्र.1 खोली क्र.26 व 27,कलेक्टर कॉम्प्लेक्स गडचिरोली या कार्यालयात निशुल्क उपलब्ध आहे.असे महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Previous articleजोडणघाट येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी !
Next articleगडचिरोलीत 78237 मजूरांना मिळतोय रोजगार, जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here