




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.9फेब्रुवारी):-मंगळवार 8 फेब्रुवारी रोजी घुग्घुस नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बहादे प्लॉट जवळील अंगणवाडी क्र.11 व 12 येथे भिंत चित्रकला आयोजित करण्यात आली होती,नगर परिषद घुग्घूस कडून कोविड-१९ उपाययोजना करीता स्प्रे मशीन माउंट चे उद्घाटन मा. श्री. देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सिनू गोसकूला, माजी जिप सभापती नितु चौधरी, जेष्ठ पत्रकार गजानन साखरकर, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या उषा आगदारी, माजी उपसरपंच संजय तिवारी, राष्ट्रवादीचे सत्यनारायण डकरे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व भिंत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.प्रथम पुरस्कार मंगेश बुरांडे 5,000 हजार व प्रमाणपत्र, द्वितीय प्यमन फरान 3,000 हजार व प्रमाणपत्र, तृतीय प्रज्वल धाबेकर 1,500 व प्रमाणपत्र, होमी 5,00 व प्रमाणपत्र, सदानंद पचारे 5,00 व प्रमाणपत्र, स्वेता चिप्पावार 5,00 व प्रमाणपत्र, शशिकांत वांढरे व राजू बोभाटे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी अमर लाड, अभिषेक जांभुळे, विक्रम क्षीरसागर, शिखा दीप, हरी जोगी, शंकर पचारे, अशोक रसाळ, विठोबा झाडे, सुरज जंगम, मोसीम शेख, स्नेहल बहादे, सुप्रिया खोब्रागडे, संदीप मत्ते, रवींद्र गोहकार, सचिन माशीरकर, सचिन चिकनकर, सोहेल खान, अंगणवाडी सेविका उर्मिला लिहीतकर, पूजा गावंडे व सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.




