



✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.फेब्रुवारी);-भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्य पतंजली योग समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संयुक्त विद्यमाने सूर्यनमस्काराचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी २०८०० सूर्यनमस्काराची संख्या पूर्ण करण्यात आली.
पतंजली योग विद्यापीठ हरिद्वार द्वारा योगगुरू रामदेवबाबा यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतात ७५ कोटी सूर्यनमस्कार करून भारत मातेला व शहीद सुपुत्रांना मानवंदना देण्यात आली असून हा उपक्रम संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने पार पडला.
यावेळी चिमूर तालुका पतंजली योग समिती प्रभारी रमेश कंचर्लावार, सहप्रभारी सारंग दाभेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष प्रा. राम चिचपाले, किशोर डोलेबांधे, कैलास भोयर, मंगेश नाईक, अँड. मधुकर लांबट, दुर्गा सातपुते, प्रियंका डोलेबांधे, रविना दाभेकर, वंदना चनोडे, शेस्पा शिरभैये, केमदेव वाडगुरे, अरुणा चिचपाले, समीर माकोडे, महल्ले आदीने सहभाग घेऊन उपक्रम पार पडला.





