Home महाराष्ट्र शिवसेनेचे विकास नैताम यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड

शिवसेनेचे विकास नैताम यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड

257

🔹मूलचेरा नगरपंचायतीवर भगवा फडकला

🔸पहिलांद्याच शिवसेनेचा नगराध्यक्ष : नागरीकांचे विकासाकडे लक्ष

✒️भास्कर फरकडे(तालुका प्रतिनिधी चामोर्शी)

मूलचेरा(दि.9फेब्रुवारी):- नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून शिवसेनेचे विकास नैताम यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला.नगराध्यक्ष पदी त्यांची अविरोध निवड झाली.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री ना एकनाथ शिंदे व जिल्हा संघटक किरणभाऊ पांडव यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेने ही निवडणूक लढविली.

जिल्हा समन्वयक किरण पांडव यांचे योग्य दिशानिर्देश,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व तालुकाप्रमुख गौरव बाला यांच्या नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापना मुळे व शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीने यापूर्वी एकही नगरसेवक नसलेल्या शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले.व मूलचेरा नगरपंचायतीवर भगवा फडकला.

नामांकन अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, तालुका प्रमुख गौरव बाला,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विकास नैताम,नगरसेवक काशिनाथ कन्नाके,नगरसेविका सौ सुनीता कोकिरवार,सौ यामीना हिवरकर,दीपक बिश्वास,सूरज सिडाम,दिगबर गावडे, आष्टीचे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर,युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य कपिल पाल, ग्रा प सदस्य संतोष बारापात्रे, आदी उपस्थित होते.

Previous articleगौ भक्त,समाजसेवक सुभाष नरुले यांचा गौरव
Next articleचिमुरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य सूर्यनमस्काराचा उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here