Home चंद्रपूर गौ भक्त,समाजसेवक सुभाष नरुले यांचा गौरव

गौ भक्त,समाजसेवक सुभाष नरुले यांचा गौरव

111

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9फेब्रुवारी):-मुक्या जनावरांची निरंतर सेवा व शुश्रूषा करणे तसेच सामाजिक सेवेला वाहून घेणारे त्यांनी समाजाप्रती उत्तरदायित्व सिद्ध केले असे सुभाष नरुले यांचा रंजन सामाजिक संस्था चंद्रपूर च्या वतीने गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सत्कारमूर्ती सुभाष नरुले,सुदर्शन नैताम,सचिन बरबतकर,गंगाधर गुरनुले, विकास कासारे, महेंद्र शेरकी, मोहन जीवतोडे,नितीन चांदेकर,प्रशांत निब्रड, पिंटू मुन,गौरव आक्केवार,स्वप्नील गावंडे,स्वप्नील सुत्रपवर,राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

सत्कार मूर्तींचे गौरव करतांना संबोधनात डॉ नंदकिशोर मैंदळकर म्हणाले सत्कार सोहळा करणे म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याचे समाजाप्रती अधिक उत्तरदायित्व होय,मुक्या जनावरांसाठी व समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव.सुभाष नरुले हे गौ भक्त,समाजसेवक आहेत ते शहरात फिरणारे पशु,आजारी पशु यांची शुश्रूषा,उपचार सेवा करतात त्यावर येणारा औषधी व चाऱ्याचा खर्च स्वतःच करतात त्यांचा कॅटरिंग चा व्यवसाय असून त्यांच्याकडे उरणारे अन्न ते शहरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांना खाऊ घालतात त्यांची सेवावृत्ती व सेवाभाव समाजातील इतर मान्यवरांना प्रेरणादायी आहे.

मुक्या भटक्या जनावरांना खाऊ घालणे व शुश्रूषा करणे हे ईश्वरीय कार्यच आहे मानवाची सेवा करणारे अनेक आहेत परंतु सुभाष जी मुक्या,जनावरांचे दुःख,भूख,तृष्णा जाणून घेतात, अबोल प्राण्यांची सेवा ही भूतदया प्रत्येकांनी आपल्या अंगी रुजवावी हा गौरवाचा उद्देश,अन्नदानाचे कार्य त्यांच्या हातून नेहमीच घडत असतात.ते सामाजिक कार्यात नेहमीच हिरीरीने भाग घेत असतात,आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काही देणें लागतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे,ज्या प्रमाणे राम सेतू तयार करतांना खरू ताईने जी मदत केली तेवढीही मदत समाजाला केली तर आपण समाजात गौरव प्राप्त करू शकतो.सुभाजीनी केलेले कार्य समाजकरिता स्फुर्तीदायी ठरो हीच अपेक्षा.कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉ मैंदळकर यांनी,संचालन सुदर्शन नैताम यांनी,आभार प्रदर्शन गंगाधर गुरनुले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here