Home बीड अंबाजोगाई शहरातील सराफ व्यापाराच्‍या; दुचाकीच्‍या डिक्कीतील १० लाखांचे दागिने लंपास

अंबाजोगाई शहरातील सराफ व्यापाराच्‍या; दुचाकीच्‍या डिक्कीतील १० लाखांचे दागिने लंपास

77

🔺चाेरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.9फेब्रुवारी):-चाेरट्यांनी अंबाजोगाई शहरातील सराफ व्यापाराच्‍या दुचाकीच्‍या डिक्‍कीत ठेवलेल्या दहा लाखांची दागिण्यांची बॅग लंपास केली. चाेरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.शहरातील गुरूवार पेठ भागामध्ये राठौर ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता दुकान मालक राहुल राठौर दुकानाचे शटरला लावलेले कुलूप उडू लागले. शटरच्या कुलपामध्ये फेविक्विक व खडे टाकल्‍याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कुलूप काढण्‍यासाठी ते शिवाजी चौकातील कूलपाची चावी बनवणाऱ्या कारागिराकडे गेले. यावेळी त्‍यांनी आपल्‍या दुचाकीच्‍या ( एमएच. ४४-एफ-४३१) डिग्गीमध्ये ९ लाख, ९२ हजार २९३ दागिने ठेवले हाेते. राहुल राठौर चावी कारागिरांना बोलत हाेते. यावेळी अज्ञात तरुणाने डुप्लिकेट चावी लावून दुचाकी लंपास केली. यानंतर चाैकात दुचाकी साेडून डिक्‍कीतील दागिने घेवून पाेबारा केला. या प्रकरणी शहर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी करीत आहेत. या घटनेमुळे व्यापार्‍यांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here