



✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव प्रतिनिधी)
हदगाव(दि.8फेब्रुवारी):-आज च्या परीस्थितीत वृक्ष लागवडीपैक्षा वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुढील काळात वृक्ष तोडीचे परीणाम होत असल्याने शासन वृक्ष लागवड करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. तर वृक्ष प्रेमी कडून वृक्ष लागवड केली जात आहे. वृक्ष लागवड करणे हे सामाजिक कर्तव्य समजून एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना राबविण्याची गरज असल्याने बरडशेवाळा येथील दुर्गे परीवाराने हदगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवडीचे कार्य करीत असलेल्या जिवनांकुर सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून नववधुच्या हस्ते वृक्ष लागवड करीत समाजासमोर आदर्श मांडला आहे.
बरडशेवाळा येथील बालाजी दुर्गे यांची मुलगी वृशाली हिचा विवाह वझरा ता.माहुर येथील किशनराव जगदाळे यांचा मुलगा रवी सोबत बरडशेवाळा येथील दत्त मंदिर परिसरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सोमवार सात रोजी सकाळी संपन्न झाला.लग्नानंतर दोन्ही कुटुंबांनी दत्त मंदिर परिसरात नववधुवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले. लागवड केलेल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दुर्गे परीवाराने घेऊन सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.यावेळी दत्त मंदिर संस्थानचे मंहत भगवान गिरी महाराज,जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरीचद्र चिल्लोरे, देशमुख, कदम , संताजीराव वटाणे, व दुर्गे व जगदाळे दोन्ही परीवार व नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.





