Home महाराष्ट्र मला विचारून ‘लफडं’ केलं का? नवनीत राणा पुन्हा नव्या वादात?

मला विचारून ‘लफडं’ केलं का? नवनीत राणा पुन्हा नव्या वादात?

145

✒️प्रतिनधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि 8फेब्रुवारी):-भाजपच्या खासदार नवनीत राणा पुन्हा अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी एका महिलेचे मन दुखावले आहे. तसेच त्या महिलेला अर्वाच्च भाषेत बोलत, तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. राणा या कायम वादात असतात. यावेळी देखील त्या वादात सापडण्याची शक्यता आहे.राणा या एका कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी एका महिलेला उलट बोलत अडचणीत आल्या आहेत. राणा यांच्या एका कार्यकर्त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन दुसऱ्या मुली सोबत लग्न केले.

त्यामुळे सदर पीडित महिला आणि त्यांची १८ महिन्यांची मुलगी पोरकी झाली. याबाबत त्यांनी मदत मागण्यासाठी नवनीत राणा यांना फोन केला मात्र राणा यांनी त्यांना उलट उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, तुम्ही दुसरं लफडा केला तो काय मला विचारून केला का?असा उलट सवाल राणा यांनी केला आहे. यामुळे सदर महिलेचे मन दुखावले आहे. तसेच त्या वेगळ्या वादात सापडल्या आहेत. मात्र सभ्य भाषेत उत्तर दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याचे देखील ऐकायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here