Home महाराष्ट्र वंचित आघाडी ची कार्यकर्ता बैठक संपन्न

वंचित आघाडी ची कार्यकर्ता बैठक संपन्न

383

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8फेब्रुवारी):-वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आगामी काळात होऊ घातलेल्या पं.स व जि.प निवडणुका संदर्भात ब्रम्ह्पुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडी ही निवडणुक पूर्ण ताकतीनिशी व स्वबळावर लढनार यासाठी शासकीय विश्रामगृह ब्रम्ह्पुरी येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली .बैठकीत विविध विषयावर चर्चा व नियोजन करण्यात आले .यामध्ये पं.स व जि.प सर्कलनुसार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व संघटनात्मक बांधणीची जबाबदारी देण्यात आली .

शिवाय इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात आला .बैठकीत प्रमुख मार्गदर्शक मा.सुखदेव प्रधान सर सदस्य , डॉ प्रेमलाल मेश्राम सल्लागार , मा अश्विन मेश्राम सहसचिव जिल्हा कमिटी हे उपस्थित होते.बैठकीचे नियोजन ता.महासचिव लिलाधर वंजारी यांनी केले .तर सुत्रसंचालन उपाध्यक्ष अनिल कांबळे व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष अरुण सुखदेवे यांनी केले .यावेळी तालुका पदाधिकारी कमलेश मेश्राम , नरेंद्र मेश्राम , सुरेश बागडे , अनंतकुमार मेश्राम , डी एम रामटेके सर , वासुदेव गजभिये , प्रफुल ढोक, निहाल ढोरे , लक्ष्मण नेवारे , धर्मप्रकाश शेंडे , अशोक शेंडे , पांडुरंग लिंगायत , प्रकाश रामटेके , प्रधान साहेब नान्होरि, मालोजी रामटेके ,महिला आघाडीच्या लिनाताई रामटेके , प्रमिला पाटील , मनीषा उमक, प्रीति हुमने , लता मेश्राम व ईतर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here