



✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.8फेब्रुवारी):-डॉ बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाला समर्थपणे साथ देणाऱ्या रमाई च्या त्यागाला इतिहासात तोड नसल्याचे प्रतिपादन रंजना आळणे यांनी केले.ते स्थानिक सुमेध बोधी विहारात त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यात बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समितिचे अध्यक्ष डॉ अनिल काळबांडे हे होते.या वेळी शारदा निथळे, प्रतिभा सोनुले, संगीता बरडे, मनोरमा भरणे, वर्षा गायकवाड यांनी रमाई च्या जिवनावर भाषणे केली.
या कार्यक्रमाला जिजाबाई लोमटे, गयाबाई वाठोरे, आरती गायकवाड, शांताबाई कांबळे, अर्चना कांबळे, रेखा गोवंदे, तन्वी गायकवाड, अर्चना घुगरे, रोहीणी रोकडे, प्रेमा पाटील, ज्योती वाठोर, केंद्रे ताई उपस्थीत होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ .काळबांडे यांनी, रमाई चा जिवन संघर्ष सांगुन सर्वानी रमाईचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन संतोष निथळे यांनी तर आभारा सह मनोगत सुधाकर कवडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम साठी विहार समितिचे भिमराव सोनुले, सुभाष वाठोरे, राहुल काळबांडे, सारनाथ रोकडे, उत्तम शिंगणकर, सचिन आठवले यांनी सहकार्य केले.


