



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.7फेब्रुवारी):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.देवेश कांबळे विराजमान होते. शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सरोज शिंगाडे विचारमंचावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या प्रा. सरोज शिंगाडे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.देवेश कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर आपल्या तेजोमय प्रज्ञेला सदाचार आणि शिलाची जोड देऊन आपले चारित्र्य निष्कलंक राखले आणि माता रमाईने जो त्याग केला त्यामुळेच कोट्यवधी लोकांच्या जीवनात नंदनवन फुलू शकले असे भाष्य केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ धम्मपाल फुलझेले यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.


