Home महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराने घेतला शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका

सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराने घेतला शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका

167

🔹भोयगाव – गडचांदूर रस्ता पूर्ण करण्याचे उपविभागीय अभियंता व कंत्राटदाराचे यांचे लेखी आश्वासन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7फेब्रुवारी):- शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अन्यूईटी कार्यक्रमांतर्गत महाकुर्ला-धानोरा-भोयगाव- गडचांदुर या रस्त्याचे काम मंजूर आहे. सदरहू रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असल्याने हा रस्ता व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलने व शासकीय पाठपुरावा केला. जनतेचे आंदोलन उभारून या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर करून घेतला. २०१९ पासून विषयांकित रस्त्याचे काम करण्यास सुरवात झाली.अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावरून २४ तास वाहतूक सुरू असते. माणिकगड सिमेंट कंपनीत ये-जा करणारे ट्रक्स व वाहने देखील या रस्त्याने जात असतात. हजारो नागरिक नियमित या रस्त्याचा वापर करीत असतात. माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी होते.दरम्यान आज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील अधिकाऱ्यांना उपस्थित राहून लेखी आश्वासन द्यावे लागेल. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा चांगलाच धसका घेतल्याचे परिसरात बोलले जात आहे.

दरम्यान १ तास नागरिकांना रस्ता रोकला. २२ जून २०२२ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याबाबतचे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर व कंत्राटदार आर. के. चव्हाण यांनी दिले.महाकुर्ला-धानोरा-भोयगाव-गडचांदूर या मार्गाने ये-जा करताना गर्भवती महिलांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. पाठीचे, मणक्याचे व हाडांचे आजार वाढले आहे.

महाकुर्ला-धानोरा-भोयगाव-गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून काम पूर्ण न झाल्याने धुळीने मार्गालगतच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कापूस काळवंडला असून इतर शेतपिकाचे उत्पन्न देखील नगण्य झाले आहे.महाकुर्ला-धानोरा-भोयगाव-गडचांदुर या रस्त्याचे काम जून पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी ॲड. वामनराव चटप यांच्या समवेत निलकंठ कोरांगे, मदन सातपुते, बंडू राजूरकर, रवी गोखरे, रत्नाकर चटप, नरेश सातपुते, विजय निखाडे, विकास दिवे, भाऊजी कन्नाके, मिनाथ बोबडे, दिलीप आस्वले, डॉ. हेपत, मुमताज अली, कब्रेश नगराळे, बबन पिदुरकर, रघुनाथ लोनगाडगे, रवींद्र ठाकरे, विश्वनाथ आसकर, सूर्यभान पोतराजे, महादेव हलके आदींची उपस्थिती होती.

Previous articleझाडीबोली साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय साहित्यपुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
Next articleगेवराई प्रशासनातील हप्तेखोरीने वाळू माफियांचा धुमाकूळ; अनेकांचा घेतला बळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here