Home चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय साहित्यपुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

झाडीबोली साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय साहित्यपुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

128

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7फेब्रुवारी):-झाडीबोली साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित केले जाते, या वर्षी २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला , ता. मूल जि. चंद्रपूर येथे दिनांक १२ व १३ मार्च २०२२ रोजी होणार आहे या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या वर्षी साहित्यकृतींना साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार होणा-या संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे .

तरी इच्छुक साहित्यिकांनी ज्यांचे साहित्य गेल्या पाच वर्षांत प्रकाशित झालेले आहेत असे साहित्य पाठवावेत,सदरील पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती, दोन फोटो आणि संक्षिप्त परिचय दिनांक १ मार्च २०२२ पर्यंन्त पोहोचेल अशा रितीने झाडीबोली साहित्य मंडळ , जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर ४४१२२८(म.रा.) या पत्यावर पाठवावेत, असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे . पुरस्कारासाठी आलेले सर्व ग्रंथ जुनासुर्ला येथे नव्याने सुरु होत असलेल्या वाचनालयात ठेवण्यात येणार आहे.तसेच ज्यांची साहित्य कृती मिळेल त्यांना आयोजन समितीच्या वतीने ऑनलाईन सन्मानपत्र देण्यात येईल.

*पुरस्काराचे स्वरूप*
१)उत्कृष्ट काव्यसंग्रह -१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
२)उत्कृष्ट कादंबरी -१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
३)उत्कृष्ट समीक्षण-१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
४)उत्कृष्ट शोधप्रबंध-१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
५)उत्कृष्ट ललीतलेख/स्फुटलेखन -१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
६)उत्कृष्ट बालकाव्य-१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
७)उत्कृष्ट कथासंग्रह-१०००/-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
—-

Previous articleघुग्घुस नगरपरिषद तर्फे भिंत चित्रकला स्पर्धा
Next articleसार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराने घेतला शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here