




🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न !
✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
वरुड(दि.7फेब्रुवारी):-विधानसभा मतदार संघाच्या वरुड शहरातील “चुडामणी नदी” ची “स्वच्छता आणि संवर्धन” करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव व नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. “नदी संवर्धन” अनुषंगाने प्रोजेक्टर वर “डेव्हलपमेंट प्लॅन” चे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने चुडामणी नदीचे संवर्धनाकरिता कचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृह, प्रसाधनगृह, सौंदर्यीकरण, सांडपाणी व्यवस्थापण, प्रोटेक्शन वॉल, विरंगुळा स्पॉट, विसर्जन घाट, ओपन जीम तसेच नदी संवर्धन या विषयाच्या अनुषंगाने चर्चा सत्र आयोजित करून उपाययोजना आखण्यात आल्या. बैठकीचा समारोप भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला.
याप्रसंगी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपस्थितांसमोर शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबतची भूमिका मांडली आणि शहरासह चुडामन नदीचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा असून त्याकरिता नागरिकांनी शहराविषयीच्या विकासात्मक संकल्पना व्हाट्स अँप द्वारे काळविन्याचे आवाहन तसेच तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.यावेळी बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू पाटील कोहळे, तारेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष, डॉ. प्रविण चौधरी, लोकेश अग्रवाल, किशोर माहोरे, रविंद्र थोरात, गौस अली, स्वप्निल आजनकर, नितीन ठाकरे, मंगेश ढोरे, कैलाश उपाध्याय, उमेश बंड, प्रविण उधळीकर,अतुल जोशी,अविनाश बनसोड, ॲड. देशबंधू , मनीष कुबडे, आनंद खेरडे, संदीप तरार, ॲड. शांतीभूषण छांगाणी, ॲड. अनिल घाटोळे, संजय चक्रपाणी, संकेत यावलकर, बंटी धरमठोक, नितीन खेरडे, संजय कानुगो, चंद्रकांत भड, प्रदीप बहुरूपी, राजू सिरस्कार, भूषण चौधरी, निखिल राऊत, किशोर तडस तसेच वरुड शहरातील नागरिक उपस्थित होते.




