



✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मुंबई(दि.7फेब्रुवारी):-लोकशाही आहे हुकूमशाही नाही, आणि आमदार म्हणजे जनतेचा सेवक, राजा नाही, लोकांची विकास कामे करा अन्यथा कायम घरीच बसवू. इशारा कम समज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.*
पक्षाच्या नावा वर निवडून आलेले उमेदवार, मतदारसंघात निवडून आल्यापासून एकदाही मतदारांना भेट न देता केवळ सत्तेचा उपभोग घेणारे धनदांडगे आमदार रमेश लटके साहेबांनी विकासकामांत लक्ष द्यावे मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात अन्यथा कायम स्वरूपी घरी बसावे लागेल असा मार्मिक टोला डॉ. माकणीकर यांनी लगावला.
विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, मतदारसंघात काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक चे काम केले आहे तेही अत्यंत निकृष्ठ दर्जाचे.., जेंव्हा ही निवडणूक येते तेंव्हा तुटलेले ब्लॉक बाजूला काढून सैल झालेले पेव्हर ब्लॉक पुन्हा लावण्यात येते असे करून आता आमदारकी नाही मिळवता येणार.
कोरोना काळात किती लोकांना कोण कोणती मदत पुरवली, किती जनांचे लसीकरण पूर्ण केले किंवा करवून घेतले, किती लोकांना अन्नधान्य किट व प्रतिकारशक्ती चे औषधे वाटप केली, किती लोकांना मास्क पुरवले, किती लोकांना अन्नदान केले, किती रुग्णांना ऑक्सिजन पुरवले, मयत झालेल्या किती परिवारांना आर्थिक मदत दिली किंवा शासनाची मिळवून दिली(?) असे अनेक प्रश्न डॉ. माकणीकर यांनी आमदार रमेश लटके यांना सोसिएल मीडियाच्या माध्यमातून विचारले आहेत.


