




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.7फेब्रुवारी):-झाडीबोली साहित्य मंडळांच्या केंद्रीय समिती चे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला (ता. मुल ,जि. चंद्रपूर) येथे दि. १२ व १३ मार्च रोजी होणार असून या संदर्भात नुकतीच जि. प. प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे सभा आयोजित करण्यात आली होती . सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन नियोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच रंजित समर्थ तर कार्याध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य गणेश खोब्रागडे आणि सहकार्याध्यक्ष म्हणून उपसरपंच खुशाल टेकाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . या सभेत मुरझा येथील संयोजक कुंजीराम गोंधळे गुरूजी यांनी २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अनुभव कथन केले.
तसेच संमेलनात परिसरातील लोककला सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली . प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर यांनी केले. सरपंच रंजित समर्थ हे सेवाभावी वृत्तीने कार्य करीत असून त्यांनी लोकसहभागातून ग्राम विकास, मंदीर जीर्णोद्धार ,कोरोना काळात गरजुंपर्यंत मदत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या गणेश खोबरागडे सुध्दा ग्रामपंचायत सदस्य असून जुनासुर्ला सेवा सहकारी सोसायटी चे ते अध्यक्ष आहेत .प्रहार सेवाधर्मी मंचाचे ते सचिव असून वाचनालयासारखे विविध उपक्रमांचे आयोजन करतात. निवड झालेल्या या मान्यवरांचे
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. याप्रसंगी डॉ. चंद्रकांत लेनगुरे उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा सहसचिव कवयित्री वृन्दा पगडपल्लीवार यांनी आभार मानले . या सभेला जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण चनकापुरे ,कवी संतोष मेश्राम , मुख्याद्यापक प्रकाश शेंडे , ग्रा.प.सदस्य राजेश गोवर्धन , कालिदास सा. वरगंटीवार , रमेशजी देशमुख , सुभाषजी देशमुख , श्री. नागनाथजी घोनमोडे , संजयभाऊ खोब्रागडे , शंकरजी शेंडे , श्री. देवरावजी तांगीडवार , श्री. प्रकाशजी कन्नाके , प्रफुलभाऊ मोटघरे , रंजितभाऊ शिंदे , विशालभाऊ उपरीकार , प्रकाशभाऊ राचेवार , निलेशभाऊ देशमुख , दिवाकरजी कोडापे , गणपतभाऊ शेडमाके , उपाध्यक्ष शा. व्य. स. सदस्य श्री . सोमनाथ शेडमाके आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .




