Home महाराष्ट्र लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था तर्फे 50 कारागिरांना टूल किट वाटप

लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था तर्फे 50 कारागिरांना टूल किट वाटप

270

🔹डिजिटल मार्केटिंगचे दिले मार्गदर्शन – असिस्टंट डायरेक्टर चंद्रशेखर सिंग

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6 फेब्रुवारी):-वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभाग नागपुर, मार्फत लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थे तर्फे 50 कारागिरांना टूल किट वाटपा करण्यात आले त्या कार्यक्रम अध्यक्ष म्हणून श्री रामलाल दोनाडकर सभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी, उद्घाटक म्हणून प्रभाकर सेलोकर मुख्य प्रशासक कृषी उत्पादन बाजार समिती ब्रम्हपुरी , सहउद्घाटक सुनीता ताई ठवकर उपसभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रशेखर सिंग असिस्टंट डायरेक्टर हस्तशिल्प विभाग नागपुर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रेमदास शेंडे सर लोक विद्यालय गांगलवाडी, वार्ताहर जगदीश भासखेत्रे ब्रम्हपुरी, सामाजिक कार्यकर्ते संजय भोयर, विवेक बनकर सरपंच गांगलवाडी, अनिल तिजारे सरपंच तळोधी, उमेश घुले सरपंच मुई, द्यानेश्वरजी दिवटे ठेकेदार बल्लारपूर, तर कार्यक्रम चे आयोजन लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थाचे अध्यक्ष सुनील बन्सोड उपस्थित होते.

वस्त्र मंत्रालय विभागाद्वारे हस्तशिल्प विभाग नागपूर मार्फत लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थे तर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील हँड एम्ब्रॉयडरी च्या 50 कारागिरांना टूल किट वाटपा करण्यात आले. साहित्य वाटपाच्या दरम्यान कारागिरांना डिजिटल मार्केटिंगचा वापर करून अम्याझान, फ्लिपकार्ट वरती वस्तू विकून आपला व्यवसाय वाढवू शकतो असे कार्यक्रमा दरम्यान सांगण्यात आले. तर उद्घाटक म्हणून प्रभाकर सेलोकर यांनी कारागिराणा विविध योजना चे मार्गदर्शन केले, सहउद्घाटक सुनीताताई ठवकर यांनी आपल्या निधी मधून काही निधी कारागिरांनवरती खर्च करणार असे सांगण्यात आले तर कार्यक्रमचे अध्यक्ष श्री रामलाल दोनाडकर यांनी शासनाच्या वतीने निधी मंजूर करून त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करणार असे जाहीर केले.

भारत देशातील हस्तशिल्प कारागीर हे असंघया कार्यक्रमामध्ये हस्तशिल्प कारागीरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नवीन तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण, अद्यावत साधनसामुग्री, बाजारपेठ पाहणी, डिजीटल मार्केटिंग, विक्री मेळावा, शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये मुद्रा लोन, गव्हर्मेंट ई मार्केटप्लस या ई काँमर्स वेबसाईट बद्दल सुध्दा माहिती देण्यात आली. ज्यावर नोंदणी करून कारागीर आपला माल जगभर पोहचवू शकतो. तसेच मुद्रा लोनद्वारे त्यांना अत्यल्प दरावर शासकीय बँकांमार्फत अर्थसहाय्य मिळण्यास मदत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील बन्सोड यांनी केले, पल्लवी बन्सोड यांनी आभार प्रदर्शन केले संजीव बन्सोड, आकाश तिजरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here