




🔸आम आदमी पार्टीची मागणी
✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.6फेब्रुवारी):-शिवनगर वार्ड क्रमांक 05 इथे मागील 25-30 वर्षांपासून नागरिक राहात आहे.परंतु तिथे असलेली नळाची पाइप लाइन ही पूर्णपणे नालीमधून गेलेली असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना नालिमधून दररोजच्या वापरासाठी पाणी भरावे लागते. ज्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.पाणी हे दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे परंतु नियमितपणे नळ येत नसल्यामुळे तेथील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी मिळत नसल्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागते.सोबतच उन्हाळा येत असल्यामुळे पाण्याच्या दुष्काळाची समस्या साहजिकच वाढणार.गेल्या अनेक वर्षा पासून येथील जनतेला वेकोली(WCL) व घुग्घुस प्रशासन एकमेकांना बोट दाखवत नागरिकांच्या समस्यान कड़े दुर्लक्ष करीत आहे.शिवनगर मध्ये असलेल्या नागरिकांची गेल्या कित्तेक वर्षांपासून पिळवणूक होत आहे.
ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा क्षेत्रीय उपप्रबंधक वणी एरिया घुग्घुस व नगरपरिषद कार्यालय घुग्घुस येथे मागणी करण्यात आली की, नालिमध्ये असलेली संपूर्ण पाइप लाइन तत्काळ बाहेर काढून दररोज नळ सोडण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टी द्वारा संपूर्ण शिवनगर वासियांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.
.
यावेळी आम आदमी पार्टी, घुग्घुस महिला सदस्य उमा तोक्कलवार, पूनम वर्मा,विपश्यना अनुप धनविजय,सोनम शेख,अंजली नगराळे,रूबिया शेख,विजया उपलेट्टी,शिला उपलेट्टी,हसीना शेख,कविता विष्णु भक्त,देविणा नाईकाप, रिना पेरपूल्ला,नईमा शेख,देविणा नाईकाप,धम्मदिणा नायडू सोबत,शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, अनुप नळे, स्वप्नील आवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…




