Home चंद्रपूर जि.प., पं.स. निवडणुकांसाठी ८ फेब्रुवारीपासून प्रभाग रचना

जि.प., पं.स. निवडणुकांसाठी ८ फेब्रुवारीपासून प्रभाग रचना

293

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6फेब्रुवारी)::- राज्य निवडणूक आयोग यांचे २ फेब्रुवारीच्या पत्रान्वये राज्यातील २५ जिल्हा परिषद व त्या अंतर्गत २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होणार असून त्यापूर्वी प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश संबंधित उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून ८ ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचना करण्यात येणार आहेत. तसे पत्र उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे. 

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया व नागपूर वगळता उर्वरित जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ८ फेब्रुवारी, नाशिक, जळगाव, अहमदनगर- ९ फेब्रुवारी, पुणे सातारा- १० फेब्रुवारी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर – ११ फेब्रुवारी, औरंगाबाद, जालना परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद व लातूर-१२ फेब्रुवारी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ १३ फेब्रुवारी तसेच चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली १४ फेब्रुवारीला प्रभाग रचना होणार आहे. हे कामकाज हाताळणारे उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीसाठी नमूद केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात निर्देशित तारखेस सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here