Home महाराष्ट्र संगीत क्षेत्रातील एक ‘अनमोल’ रत्न हरपला!

संगीत क्षेत्रातील एक ‘अनमोल’ रत्न हरपला!

133

गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ आपल्या मधुर आवाजाची मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या लतादीदी रुग्णालयात आजाराशी झुंज देत असतानाच त्यांचं दुःखद निधन झालं..दिदींच्या निधनानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले.दिदींच्या जाण्याने संगीत क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं..त्यांच्या मृत्यूने संगीत क्षेत्रातील एक महान पर्वाचा अस्त झाला.एक अनमोल रत्न काळाच्या पडद्या आळ झाला.९३ वर्षीय लता मंगेशकर यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्यानं तसंच न्यूमोनिया झाल्यानं त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होतं पण शेवटी त्यांची प्राणज्योत मावळली…

२९ सप्टेंबर १९२९ रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने सगळ्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील सात अश्याचार्यातील एक आश्चर्य म्हणजे दिदींचा आवाज होता..संगीत क्षेत्रातील एक अनमोल रत्न म्हणून दिदींचा गौरव केला जायचा.शतकानुशतके त्यांच्या गोड आवाजातील गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील अशी आहेत. लतादीदींनी जगभरातील ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाच्या माध्यमातून भारताचे नाव जगात उंचावणाऱ्या लता मंगेशकर यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होत.लतादीदींना घरातच गाण्याचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, तर आई गुजराती होती. लतादीदींनी लहानपणापासूनच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. मात्र वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांचं पितृछत्र हरपलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लतादीदींना लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी पेलावी लागली. यासाठी त्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. मराठी, हिंदी चित्रपटात गाणी गाण्याची संधी मिळावी यासाठी त्या धडपडत होत्या.

त्यांना पहिली संधी १९४२ मध्ये ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटातील गाण्यानं मिळाली. तर पहिली मंगळागौर या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना मास्टर गुलाम हैदर यांच्या ‘मजबूर’ चित्रपटातील ‘इंग्लिश छोरा चला गया’ या गाण्यात प्रसिद्ध गायक मुकेशसोबत गाण्याची संधी मिळाली; पण हिंदी चित्रपटससृष्टीत पार्श्वगायिका म्हणून त्यांना ओळख मिळाली ती ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एकापेक्षा एक अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी त्यांच्या नावावर लिहिली गेली. लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळालं होतं ते होतं फक्त २५ रुपये.पैसा, प्रसिद्धी पायाशी लोळण घेणाऱ्या लता मंगेशकर यांची जीवनशैली मात्र अत्यंत साधी होती. देवी सरस्वतीचे रूप असं त्यांना म्हटलं जातं होत.

लता मंगेशकर यांचं वलय खूप मोठं असलं तरी त्यांची राहणी साधी आणि शिस्तीची होती. त्यामुळेच नव्वदीतही त्या ठणठणीत होत्या. सगळी काळजी घेऊनही अखेर कोरोना ने त्यांना गाठलंच.लता मंगेशकर यांनी त्यांचं सेलेब्रिटी स्टेटस कधीच कुरवाळलं नाही. कितीही वलयांकित व्यक्ती असल्या तरी त्यांची राहणी अगदी साधी आणि शिस्तीची होती. त्यांची लाइफस्टाइल हेच त्यांच्या नव्वदीतही राखलेल्या फिटनेसचं रहस्य होतं.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाही झाला आणि त्यांची तब्येत खालावत गेली. कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा त्या सर्व संकेत पाळत घरातच राहिल्या होत्या. दोन वर्षांत घराबाहेरही पडल्या नव्हत्या. पण त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका मदतनीसाला कोरोना विषाणूची लागण झाली आणि त्यामुळेच लतादीदींचीही चाचणी करण्यात आली. तब्येत बिघडायला हे निमित्त पुरलं.लता मंगेशकर यांची जीवनशैली अत्यंत साधी होती. त्या तब्येतीची काटेकोरपणे काळजी घेत असत. वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत त्यांची तब्येत उत्तम होती. त्यांना कुठलाही मोठा आजार नव्हता याचं रहस्य त्यांच्या शिस्तीच्या जीवनशैलीत होती.त्यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!!

✒️लेखक:-प्रा डॉ सुधीर अग्रवाल(मो:-९५६१५९४३०६)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here