Home Education जि.प.प्रा.मराठी शाळेत गणवेश वाटप…

जि.प.प्रा.मराठी शाळेत गणवेश वाटप…

275

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.6फेब्रुवारी):-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा धरणगाव येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मंदाताई जितेंद्र धनगर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा नगरसेविका न.पा. धरणगाव यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेतील पदवीधर शिक्षक महेंद्र साहेबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

तसेच राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पंढरीनाथ गिरीधर पाटील यांनी सर्व लाभाच्या योजना संदर्भात सखोल मार्गदर्शन करून जिल्हा परिषद शाळेत शिकण्याचे महत्त्व उदाहरणादाखल पटवून सांगितले. कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, समाजसेवक, शाळेचे माजी विद्यार्थी जितेंद्र धनगर सिद्धार्थ एकनाथ पारेराव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र रुंझू गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here