Home बीड सिरसदेवीत पत्रकार शाम अडागळे यांना राशन दुकानदारांच्या माणसाकडून राशन च्या बातम्या का...

सिरसदेवीत पत्रकार शाम अडागळे यांना राशन दुकानदारांच्या माणसाकडून राशन च्या बातम्या का लावतो म्हणत शिविगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न

80

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.5फेब्रुवारी):- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे आज दि 5 शनिवारी साडे बारा ते एक च्या सुमारास पत्रकार शाम अडागळे यांना राशन दुकानदारांच्या माणसाकडून शिविगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सविस्तर असे की सिरसदेवीवितील राशन दुकानदारांनी डिसेंबर महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्य राशन दुकानदारांना शासनाकडून मिळूनही लाभार्थ्यांना वाटप न करताच गायब केला होता या संदर्भात पत्रकार अडागळे यांनी वृत्तपत्रात बातम्या लावल्या होत्या म्हणून आज दुपारी सिरसदेवी फाटा येथे अडागळे यांना राशन दुकानदारांचा माणूस नाव कचरू वक्ते यांनी दारू पिऊन शिविगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला व तुला काय बातम्या लावायच्या त्या लाव तुला आम्ही बघून घेऊ अशी धमकी दिली यावरून सिद्ध झाले आहे की पत्रकार यांनी राशन घोटाळा उघड केल्यामुळे सिरासदेवीतील राशन दुकानदारांचा किती दबाव आहे तसेच सामान्य कार्डधारकाने जर यांच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांचे काय करतील हेही सिद्ध झाले आहे.

त्यामुळे पत्रकार शाम अडागळे यांच्या जीवितास राशन दुकानदारांकडून धोका आहे उद्या त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो यामुळे अडागळे राशन दुकानदार विरुद्ध बीड जिल्हा अधिकारी ,जिल्हा पुरवठा अधिकारी, आणि तलवाडा पोलीस स्टेशन यांच्याकडे कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी तक्रार देणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here