




🔹डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला/आरोपी ला दहा दिवसांची पोलिस कोठडी
✒️सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.5फेब्रुवारी):- शहरात भर दिवसा गोळ्या झाडून डॉक्टरची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला/मारेकऱ्याला पोलिसांनी मध्ये प्रदेशातील धार येथून अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपीला दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुसद न्यायालयातील न्यायाधीश व्हि. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.मुख्य आरोपी ऐफाज अबरार शेख राहणार पुसद हे पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता.
त्याआधी त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केले होते. परंतु मुख्य आरोपी ऐफाज हा फरार होण्यात यशस्वी झाला होता.परंतु पोलिसांच्या अथक प्रयत्नाने आरोपीला मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.त्याला आज पुसद न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने 10 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.डॉ. हनुमंत धर्मकारे यांची हत्या का ? करण्यात आली. त्याचे मुख्य कारण काय होते.
हे येणाऱ्या दिवसात नक्कीच कळेल.पोलिसांना येणाऱ्या दहा दिवसात मुख्य आरोपी कडुन पूर्ण माहिती घेण्याचे व हत्याकांड घडविण्याची माहिती घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.कारण गोर गरिबांची सेवा करणाऱ्या डॉक्टराची हत्या करण्याचे काय कारण आहे हे आता लवकरच उघड होणार आहे.




