Home महाराष्ट्र पाळा येथे पर्यटन विकासाकरिता १ कोटी १९ लाख २६ हजारांचा निधी मंजूर...

पाळा येथे पर्यटन विकासाकरिता १ कोटी १९ लाख २६ हजारांचा निधी मंजूर !

285

🔸मोर्शी मतदार संघामध्ये पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार — आमदार देवेंद्र भुयार

🔹श्री संत सच्चिदानंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्ट पाळा येथील विकास कामे पूर्णत्वास जाणार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.5फेब्रुवारी):-विधानसभा मतदार संघामध्ये तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली आहे. मोर्शी वरुड तालुक्यात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत विविध योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.मोर्शी विधानसभा मतदार संघातील पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केल्यामुळे शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्री संत सच्चिदानंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्ट पाळा येथील विकास कामे व सांस्कृतिक भवन निर्माण करण्याकरिता १ कोटी १९ लाख २६ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

मोर्शी मतदार संघातील पर्यटनस्थळांच्या विकास कामांसाठी तब्बल १ कोटी १९ लाख २६ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील रुपये ३० लाख रुपये इतका निधी वितरणासाठी नुकतीच मान्यता मिळाली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांतून हा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून पाळा येथील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली असून यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून मोर्शी विधानसभा मतदार संघातील तीर्थक्षेत्र स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करून पर्यटकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे.राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतांना सर्वाधिक रोजगार निर्मिती क्षमता असलेल्यांपैकी या क्षेत्राकडे पर्यटकांना आकर्षित करून त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

मोर्शी विधानसभा मतदार संघ हा तीर्थक्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या मतदार संघाला सातपुडा पर्वत, निसर्ग पर्यटन केंद्र, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, अप्पर वर्धा धरण, विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून निसर्गसंपदा लाभली आहे. तसेच प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळे देखील आहेत. त्यामुळे मोर्शी मतदार संघातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचे अविरत प्रयत्न सुरू आहे. मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र पाळा येथील श्री संत सच्चिदानंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्ट पाळा येथील पर्यटन विकासाकरिता १ कोटी १९ लाख २६ हजारांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here