Home महाराष्ट्र पिंपळदरी व आडद येथे जि.प.सदस्य चितांगराव कदम सर यांच्या प्रयत्नांने८४लक्ष रुपयांचे विकास...

पिंपळदरी व आडद येथे जि.प.सदस्य चितांगराव कदम सर यांच्या प्रयत्नांने८४लक्ष रुपयांचे विकास कामांचे भुमिपुजन

244

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि.फेब्रुवारी):-मुळावा जिल्हा परिषद गटातील पिंपळदरी ,आडद येथे जिल्हा परिषद सदस्य श्री चितांगराव कदम सर यांच्या प्रयत्नाने ८४लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन करण्यात आले.पिंपळदरी व आडद येथे आज दिनांक४फेब्रुवारी२०२२रोजी भुमिपुजन संपन्न झालेल्या विकास कामांमध्ये ओटीएसपी योजनेअंतर्गत पिंपळदरी आडद जोड रस्ता डांबरीकरण ६०लक्ष रू,*खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या निधीमधुन आडद येथे ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे ७लक्ष रू,* अनुसुचित जाती ,नवबौद्ध घटकांचा विकास योजनेअंतर्गत समाज मंदिर बांधकाम करणे ७लाख रू, जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभुमी दहनशेड बांधकाम करणे ५लक्ष रू, जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे ५लक्ष रू. या ८४लक्ष रूपयांच्या विकास कामांचा समावेश आहे.

यावेळी सतीश नाईक (शिवसेना तालुकाप्रमुख उमरखेड),गजानन सोळंके (पंचायत समिती सदस्य),अविनाश कदम (उपजिल्हा प्रमुख),कपिल पाटील चव्हाण(तालुकाप्रमुख युवासेना),संतोषभाऊ जाधव(उप तालुकाप्रमुख शिवसेना),बंडूभाऊ ढाकरे (सरपंच पिंपळदरी),विठ्ठल ठाकरे(उपसरपंच),रमेश शिंदे(शाखाप्रमुख मुळावा),निचल साहेब,बाळासाहेब देशमुख(मुळावा),देवानंद पाचपुते(सरपंच धनज),संदिप खंडाळे(विभागप्रमुख ),दिगांबर चव्हाण वानेगाव, दत्तराव कदम पार्डी(बं),अनिल झरकर,रामराव चव्हाण,गोविंद पत्रे मुळावा,नितीन देशमुख,विजय हनवते,मारोती कऱ्हाळे, गणेश गुहाडे, गुलाब मिराशे,अशोक कबले, संदेश कांबळे,दत्ता माहुरे, उत्तम माहुरे, दुधे ग्रामसेवक यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here