Home महाराष्ट्र घुग्घुस येथील वेकोलीच्या कामगार वसाहतीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु

घुग्घुस येथील वेकोलीच्या कामगार वसाहतीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु

321

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹भाजपाच्या पाठपुराव्याला मोठे यश

घुग्घुस(दि.5फेब्रुवारी):-शनिवार 5 फेब्रुवारी पासून वेकोलीच्या रामनगर, इंदिरा नगर, सुभाष नगर, गांधी नगर, राजीव कॉलनी या कामगार वसाहतीच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या घुग्घुस भाजपाच्या मागणीला मोठे यश आले आहे.वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस भाजपाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन वेकोली वणी क्षेत्राच्या विविध वसाहतील रस्ता दुरुस्ती करणे, क्वार्टरची दुरुस्ती करणे, साफसफाई करणे अशी मागणी करण्यात आली.

त्याअनुषंगाने भाजपाच्या मागणीची तात्काळ दाखल घेत रामनगर वसाहतीत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले तसेच इतर कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे.भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंच.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी उपसरपंच संजय तिवारी,माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, भाजपाचे मल्लेश बल्ला, श्रीकांत सावे विक्की सारसर, मास्टर बहुराशी यांनी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली व रस्त्याचे काम सुरु केल्याबद्दल वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे तथा उप क्षेत्रीय प्रबंधक श्री. ओमप्रकाश फुलारे यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here