




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.5फेब्रुवारी):-शनिवार 5 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथील पोळा मैदान येथे नगर परिषद तर्फे स्वच्छता करण्यात आली.
मुख्याधिकारी अर्शीया जुही व नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली.याप्रसंगी बोलतांना मुख्याधिकारी अर्शीया जुही म्हणाल्याआठवड्यात एकदा स्वच्छ भारत अंतर्गत श्रमदान घेण्याचे नगर परिषद तर्फे ठरविण्यात आले होते. शहरातील एक एक वार्ड घेऊन शहराची पूर्ण स्वच्छता करण्याचा उद्देश आहे. नगर परिषदेने स्वच्छता सर्वेक्षणा मध्ये माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदविला असल्यामुळे आम्हाला स्वच्छता करण्याचे ध्येय संपादित करायचे आहे.
स्वच्छता अभियानात सफाई कर्मचारी व सफाई मित्र सोबत आहे. मी शहर वासियांना आवाहन करतो घरातील कचरा बाहेर टाकू नका तो कचरा गाडीत टाका. पोळा मैदानात जेसीबी मशीनने स्वच्छता करण्यात आली तरी येथे कचरा टाकू नये टाकल्यास दंड करण्यात येईल सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा.यावेळी नगर परिषदेचे सफाई कर्मचारी शंकर पचारे,सुरज जंगम, विठोबा झाडे, हरिदास जोगी, संदिप मत्ते, सचिन मासिरकर, रविंद्र गोहकार, अशोक रसाळ,मोसीम कुरेशी,दिनेश बावणे, सुप्रिया खोब्रागडे, व स्नेहल बहादे उपस्थित होते.




