Home महाराष्ट्र कष्टकरी महिलांचे प्रेरणास्थान माता रमाई

कष्टकरी महिलांचे प्रेरणास्थान माता रमाई

263

कष्टकरी महिला नेहमी आपल्या पकष्टकरी महितिदेवला सर्वच कामात सतत मदत करीत असतात अशा महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई.माता रमाई बाबत आज प्रयन्त अनेक प्रकारचे लिखाण हे भावनिकच झाले आहे.रमाबाईच्या कष्ट त्यागाला भावनिक केल्या गेले आहे.भिमराव आंबेडकर यांना जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मना पासुन पत्नीची साथ होती.ती प्रेरणा खेडया पड़यातील व शहरातील झोपड़पट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीनी घेतली म्हणुन ते आंबेडकर चळवळीतील प्रत्येक जन आंदोलनात पति पत्नी सहभागी होतात.विशेष ते सर्वच असंघटित कामगार असतात.पण असंघटित कामगार म्हणुन ते कोणतेही आंदोलन करीत नाही.त्याची त्यांना जाणीव नाही.रमाबाई आणि भिमरावचे सर्व नातलग कोणते कामगार होते?

रमाबाई बदल जेवढा आदर अडानी अशिक्षित असंघटित महिला करतात तेवढा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या महिला करत नाही.अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही.(देत असतील अशा त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि माफी सुद्धा )आज प्रयन्तचा इतिहास आणि अनुभवा वरुन हे लिहतो.अन्यता आंबेडकर चळवळीत आज जी लेटरहेड वर जगणाऱ्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षांची संख्या आहे ती राहली नसती.प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलाचा हात असतो, तसाच एका अपयशस्वी पुरुषा मागे ही एका महिलांचा हात असतो.मग घराघरत असलेल्या आंबेडकर चळवळीतील गटागटच्या नेत्यांच्या महिलाचे प्रेरणा स्थान कोणते?

रमाबाई भीमराव आंबेडकर (जन्म ७ फेब्रुवारी १८९८ मूत्यू २७ मे १९३५ ) या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दापोली तालुकयातील दाभोळ जवळच्या वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असत. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते.

त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.समाजात दुखाचेच जास्त वर्णन केले जाते.असंघटीत कष्टकरी समाजाच्या कष्ट,त्याग आणि जीद्धीने लढण्याची दखल घेतली जात नाही.दुख मुळासकट नष्ट करण्यासाठी कष्ट करा त्याग करून जीद्धीने सकारत्मक विचाराने लढा असे तथागत सांगतात.नकारत्मक विचार करीत राहिला तर कायम दुखच असणार आहे.रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो.असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही.त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवरया बदल राई चा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.

याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा, दूरदृष्टिपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा मंत्र आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती.आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.रमाबाई वर असे प्रसंग किती वेळा आले.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाईची मानसिक परिस्थिती काय असेल. घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. पण काय वर्णन करून ठेवले आल्या थोर विचारवंतांनी??.
रमाबाई ची रमाई कशी झाली किती लोकांना माहित आहे.बाबासाहेब शिक्षणा करिता आणि समाजाला मान सन्मान मिळवून देण्या करिता सतत ब्रिटिशांच्या बरोबर पत्रव्यवहार आणि गाठी भेटी घेत असत.असे एकदा राजगृहावर बाबासाहेब व रमाबाई राहत असताना त्यांना अचानक परदेशी महत्वाच्या कामानिमित्य जायचे होते.पण रमाबाईला एकटे सोडून कसे जाणार हा प्रश्न पडला होता.तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या एक मित्र धारवाडच्या वराळे काका कडे रमाबाईला पाठवितात.

धारवाडचे वराळे काका मुलाचे वसतिगृह चालवीत होते त्याच्या आवारात नेहमी लहान मुले खेळायला येत असत.रमाबाईला दोनचार दिवसात मुलांचा लळा लागला.नेमके तीन दिवसा नंतर आवारात मुलाची किलबिलाट दिसली नाही.वराळे काका चिंतेत दिसतात.म्हणून रमाबाई काका ना विचारतात मुले दोन दिवसात आवारात खेळताना दिसत नाही.कुठे गेली का?.तेव्हा वराळे काका सांगतात दोन दिवस झाले मुले उपाशी आहेत त्यामुळे मुले खेळायला आले नाही.कारण अन्न धान्याची मदत महिन्याला भेटत असायची ती अजून मिळाली नाही.ती मिळाल्याला तीन दिवस लागतील.त्यामुळे मुलेही तीन दिवस उपाशी राहतील.वराळे काका अगदी कंठ दाटून ते सांगत होते.त्यामुळे रमाबाई घरात आपल्या खोलीत जातात थोड्या रडत बसतात.नंतर कापटातील डबा काढतात त्यातील सोन आणि सोन्याच्या हातातील बांगड्या काढून वराळे काकाच्या हातात देतात.विका किंवा गहान ठेवून ह्या मुलाच्या जेवणाचा बंदोबस्थ करा.त्या नंतर मुले पोटभर जेवतात आणि खूप आनंदात राहतात.हे पाहून रमाबाई खूप आनंदी होतात.त्यामुळे सर्व मुले रमाबाईला रमाआई रमाई म्हणून बोलायला लागतात.वराळे काकाच्या त्या वेळे पासून सर्वच लोकच्या रमाबाईच्या रमाई झाल्या.

रमाबाईचे पतीनिष्ठ उदाहरण द्रुष्टी समोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत. स्त्री महिला हा समाजाचा अलंकार आहे.आपल्या कुटुंबाचे आणि कुळाचा नांव लैकिक स्रियाच्या शिलावरच अवलबून असतो. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता हि असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरवात पासून शेवट प्रयन्त रमाबाई नी हाल अपेष्ट,दुख गरिबी याच्याशी सतत संघर्ष करीत राहिल्या त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत होत्या पण त्यांनी बाबासाहेबाकडे तक्रार केली नाही अशा माता रमाई च्या जयंती निमित्त सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा !.धन्यवाद !!!

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना)मो:-९९२०४०३८५९

Previous articleआ. गुट्टे यांच्या प्रयत्नाने गंगाखेड-इसाद-पिंपळदरी- किनगाव महामार्गाच्या कामाला मंजुरी
Next articleपाच राज्यांची निवडणूक आणि बहुजन पक्षांची तयारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here