Home महाराष्ट्र आ. गुट्टे यांच्या प्रयत्नाने गंगाखेड-इसाद-पिंपळदरी- किनगाव महामार्गाच्या कामाला मंजुरी

आ. गुट्टे यांच्या प्रयत्नाने गंगाखेड-इसाद-पिंपळदरी- किनगाव महामार्गाच्या कामाला मंजुरी

323

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

परभणी(दि.5फेब्रुवारी):- लातूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ K गंगाखेड – ईसाद – पिंपळदरी मार्गे किनगाव हा अत्यंत महत्वाचा महामार्ग असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. हा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या रस्त्याच्या विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करून मंजुरी सह निधीची मागणी केली होती.

आमदार गुट्टे यांनी या कामाबाबतीत केंद्रीय मंत्री महोदयाकडे सतत पाठपुरावा केल्याने त्याचे फलस्वरुप म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ K गंगाखेड, इसाद, पिंपळदरी मार्गे किनगाव या २७.७ किमी रस्ता पेवर शोल्डर पद्धतीने दोन पदरी करण्याकरिता २२१ कोटी ६३ लाख १३ हजार ७२२ रुपयांच्या निधीस मंजुरी दिली असून या कामाची निविदा नुकतीच निघाली आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करावयाचे असून या कामाची मुदत दहा वर्षाची आहे.

आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी हिंगोली-औंढा-हट्टा-पूर्णा- पालम ते राणीसावरगाव रस्ता रामा २४९ किमी १२७/०० ते १६३ ची सुधारणा करणे ता.पालम या रस्त्याच्या विकास कामांकरिता ३८३ कोटी रुपये विकास कामाची व पिंपळदरी-अंतरवेली रस्ता प्रजिमा १९ किमी २०/०० ते ३४/५०० ची सुधारणा करण्याकरिता १२० कोटी रुपयांच्या विकास कामाची मागणी केली असून या कामांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आमदार गुट्टे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या सततच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ K गंगाखेड- इसाद-पिंपळदरी मार्गे किनगाव या रस्त्याच्या विकास कामाची निविदा निघाली असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ K गंगाखेड,ईसाद,पिंपळदरी मार्गे किनगाव या रस्त्याच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमदार गुट्टे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.ना नितीन गडकरी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here