



🔸बांधकाम तपासणी समिती अनभिज्ञ
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.5फेब्रुवारी):-तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू असून पंतप्रधान ग्राम सडक योजना- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर अनेक योजनेचा अंतर्गत शासन-प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेचा माध्यमातून डांबरीकरण रस्ते – ब्रिज-पुलीया- काॅंक्रेट रस्ते, नाल्यांचे काम जिवती तालुक्यात सुरू असुन शासन-प्रशासन चांगले दर्जेदार काम करण्याकरिता कोट्यावधी रुपये कामासाठी खर्च करीत आहेत परंतु तालुक्यातील नंदप्पा ते आनंद गुडा- भोकसापूर- संगणापूर या मार्गाचे संथगतीने काम सुरू असुन या कामासाठी वापरण्यात येणारे मटेरियल अंदाजपत्रका नुसार वापरले जात नसुन याच परिसरातील निकृष्ट दर्जाचा मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापरण्यात आला आहे.
मुरुमाची जाडी – जिएसबीची जाडी-गिट्टीची जाडी ज्या प्रमाणात वापरली जाते त्या प्रमाणात वापरण्यात आली नाही.सध्या बिबीएम डांबरचे काम झाले त्याची जाडी तपासण्यात यावी. या मार्गावर लहान पाईप पुलीयाचे काम व सिमेंट काॅक्रेट रस्त्याचे काम झाले या कामासाठी निकृष्ट दर्जाची मातीमिश्रीत काळी रेती व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरले असल्यामुळ या निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित कंत्राटदार व अधिकारीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी बोलताना सांगितले आहे.


