Home महाराष्ट्र महोगनी वृक्ष लागवड करण्यासाठी गटवीकास अधिकारी गड्डापोड यांनी केले मोलाचं मार्गदर्शन

महोगनी वृक्ष लागवड करण्यासाठी गटवीकास अधिकारी गड्डापोड यांनी केले मोलाचं मार्गदर्शन

71

✒️सिध्दार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड)मो:-9373868284

हदगांव(दि.5फेब्रुवारी):- तालक्यातील निवघा बाजार नजीक असलेल्या मौजे हस्तरा येथील दहा शेतकर्यांनी महोगणी वृक्ष लागवड करून या योजनेचा प्रथम श्रीगणेशा केला आहे . असुन आज दि 04/02/2022 आमचे प्रतिनिधी यांना हस्तरा येथे शेतकऱ्यांनी आमंत्रित केले असता तिथे आज पर्यंत 7 शेतकऱ्यांनी महोगनी वृक्ष लागवड केली असुन आठ एकर शेती करीता शेतकरी बांधवांची गरबड सुरू होती गावात ह्या बाबतीत सवीस्तर माहीती करीता अनेक अधीकारी उपस्थित होते त्यामध्ये तालका कृषी अधिकारी रणवीर , क्रापसिटी एग्रोवेहट या कंपनीचे मार्गदर्शक थोरात , कृषि तंत्रज्ञ सतिश खानसोळे , विस्तार अधिकारी रणजित लोखंडे , वृक्ष मित्र हरीषचंद्र चिल्लोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महागणी वृक्ष लागवड हे शेतक – यांसाठी आधुनिक व्यवसाय शेतीतून एक नवीन उत्पन्नाचे स्त्रोत समोर आले आहे . यासाठी शासनाकडून प्रत्येक झाडामागे अनूदान सुध्दा उपलब्ध होणार आहे . वृक्ष वाढीचा कालावधी बारा वर्षाचा असताना या झाडापासून उपजणारे बियाणे कंपनी कडून विक्री घेतले जाणार असून या साठी एकरी पन्नास हजार रूपये इतका मोबदला मिळणार आहे . त्यानंतर झाडांच्या पर्ण वाढीनंतर अर्थात आठ ते बारा वर्षा दरम्यान विक्री केल्यास या पासून प्रति घनफूट एक हजार रुपये प्रमाणे भाव मिळतो साधारणपणे एका झाडापासून २०,००० रु उत्पन्न मिळू शकते .

अशी माहिती थोरात यांनी दिली असुन तालुका कृषी अधिकारी रनवीर यांनी देखील शेतकरयांना योग्य मार्गदर्शन केले असल्याचे गावकर्यातर्फे सांगण्यात आले बालाजी चीलोरे ,गणेश मस्के, सुदर्शन सोळंके ,विठ्ठल मस्के, बाळू मस्के, संदीप चील्लोरे ,पिंटू चील्लोरे, गजानन उकंडे ,लक्ष्मण जटाळे ,भगवानराव सोळंके ह्या हस्तरा येथील दहा शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून तेथील ग्रामपंचायत वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने आलेल्या सर्व पदाधिकारी यांना सदर माहिती देण्यात आली.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पेक्षा व्यावसायिक शेती कडे लक्ष वेधून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे.गटविकास अधिकारी केशव गड्डापोड हदगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here