Home महाराष्ट्र असहाय्य पित्याची मदतीसाठी प्रतीक्षा; सहा वर्षे झिजवताहेत नगरपरिषदेची पायरी;मुख्याधिकारी झटकतायत आपली जबाबदारी

असहाय्य पित्याची मदतीसाठी प्रतीक्षा; सहा वर्षे झिजवताहेत नगरपरिषदेची पायरी;मुख्याधिकारी झटकतायत आपली जबाबदारी

273

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4फेब्रुवारी):-2016 साली म्हसवड- पंढरपूर रस्त्यावर गलांडे हॉस्पिटल समोर शिवजयंतीचे झेंडे लावत असताना म्हसवड,ता.माण,जि. सातारा या शहरातील आकाश देवकर या तरुणाचा पथदिव्याचा पोल विद्युत भारित असल्यामुळे शॉक लागून प्राणांतिक अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला सहा वर्षे होऊनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्याच्या नुकसान भरपाईची मागणी करण्याचे निवेदन आज पुन्हा मोहन देवकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले.

सदर निवेदनात म्हटले आहे की माझ्या एकुलत्या एक मुलाचा जो माझा सर्वस्वी आधार होता त्याचा 1 मे 2016 रोजी पथदिव्याच्या पोलला शॉक लागून प्राणांतिक अपघात होऊन मृत्यू झाला त्यावेळी विद्युत निरीक्षक (विद्युत निरीक्षण विभाग सातारा) यांनी प्रत्यक्ष केलेली पाहणी आणि चौकशी नुसार निदर्शनास आणून दिले होते की पथदिव्याचे मालक नगरपरिषद ही असून त्याची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे सदर मानवी प्राणांतिक अपघाताच्या नुकसान भरपाईस विद्युत संच मांडणीचे मालक (म्हसवड नगरपरिषद) जबाबदार आहे असे त्यांनी त्यांच्या लेखी अहवालात दिले असून कोणत्याही प्रकारची मदत आजपर्यत आपल्याकडून झाली नाही. त्याविभागाकडे अर्ज केल्यानंतर मदतीच्या अपेक्षेने थांबलो परंतु त्यांनी उत्तर अहवालात आहे त्याप्रमाणेच दिले.

त्यानंतर आपल्याकडे विनंती अर्ज केल्यानंतर आपण तीन वर्षानंतर पत्राने कळविले की सदर विद्युत पोल हे सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्या मार्फत उभारण्यात आले आहेत याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही हे कळवायला आम्हाला एवढा वेळ का लागला.
यावेळी बोलताना मोहन देवकर म्हणाले सदर मदतीसाठी आज नगरपरिषदेत गेलो असता मुख्याधिकारी सचिन माने हे सरळ सरळ आपली जबाबदारी झटकत आहेत ते आम्हाला मदत मिळवून देण्याचे ऐवजी आरोपी म्हणून महावितरण जबाबदार असल्याचे सांगतायत. आणि सदर पथदिवे हे नगरपरिषदेकडे वर्ग नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महावीतरणची आहे.

पूर्वी महावितरणला पत्रव्यवहार केला त्यावेळेला त्यांनी दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की संबंधित पथदिव्याच्या पाहणी दरम्यान पोलच्या आतील वायरींग स्पार्क झाल्यामुळे इन्सुलेशन वितळून त्याचा स्पर्श पोलला झाला आणि त्यामुळे संबंधित पोल विद्युत भारित झाला त्याचा स्पर्श आकाशला झाल्यामुळे प्राणांतिक अपघात झाला सदर विद्युत संच मांडणीची योग्य ती देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे झाला असल्याने सदर प्राणांतिक अपघाताच्या नुकसां न भरपाईस विद्युत संच मांडणीचे मालक(नगरपरिषद म्हसवड) हेच जबाबदार आहेत.
मग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने हे जर आपली जबाबदारी झटकत असतील आणि आम्हाला मदत मिळवून देत नसतील तर नाविलाजास्तव आम्हाला सर्व कुटूंबासहीत नगरपरिषदे समोर आत्मदहन करावे लागेल आणि मला व माझ्या कुटूंबाचे काही बरे वाईट झाले तर यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील.याची दाद आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचेकडेसुद्धा मागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here