




🔸विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.4फेब्रुवारी):-विधानसभा मतदार संघातील ३३ गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून जलजीवन मिशन अंतर्गत २० कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या माध्यमातून हा निधी मंजुर झाल्याची माहिती माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांच्या मंजुरीसाठी दाखल प्रस्तांवाबाबत बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सुमारे ३३ गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांसाठी २० कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकारने मंजुर केला आहे. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी केलेल्या मदतीबाबत विजयसिंह पंडित यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये पाझर विहिर, पाण्याची टाकी, पाईपलाईन, पंपहाऊस, पंपींग मशिनरी, जलकुंभ, उदर्रवाहिनी आणि वितरण व्यवस्थेचा समावेश आहे. मौजे टाकरवन या मोठ्या गावातील योजनांमध्ये जलशुध्दीकरण केंद्राचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनांची कामे दर्जेदार करण्यासाठी गावातील स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे. नळ पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. संबंधित गावाच्या ग्रामस्थांनी विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले, लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.




