



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.4फेब्रुवारी):- तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी, योजना मधील मंजूर लाभारती २०१८ साली तहसील कार्यालय येथील आवक जावक विभागात सादर केलेले अर्ज त्यापैकि जे योग्य व गरजूवंत लाभार्थीं आहेत ते तहसील कार्यालय गंगाखेड येथील कर्मचाऱ्यामुळे सदरील योजनेपासून वंचित राहिलेले आहेत काही पात्र लाभार्थ्यांचे अर्जाची विचारपूस केली तर उडवा उडविचे उत्तरे कर्मचारी देत आहेत उर्मट भाषेचा वापर करत आहेत कर्मचारी आपल्या मनमानी कारभारात मग्न दिसून येत आहेत अर्ज मंजूर करण्यासाठी गरीब लाभार्त्या कढून पैशाची मागणी करत आहेत.
तसेच २०१८ साली दाखल केलेले अर्ज मंजूर न करता सण २०२१ सालीचे पैसे घेऊन मंजूर करत आहेत व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जाणीव पूर्वक पैसे न दिल्यामुळे गहाळ केले आहे ते सर्व अर्ज आपल्या कार्यालयात आवक जावक विभागात तलाठी मार्फत दाखल केलेले आहेत या मधील काही लाभार्थी मृत पावलेले आहेत लाभार्त्याना त्यांच्या हक्काच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे दोषी कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करून पात्र लाभार्त्याना न्याय मिळवून द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे


