



✒️तलवाडा प्रतिनिधी(शेखआतिख)
गेवराई(दि.4फेब्रुवारी):- तालुक्यातील तलवाडा जि. प. गटातील मिरगाव येथील रहिवाशी भाऊसाहेब गोडबोले यांच्या पांगुळगाव शिवारातील शेतातील तेरा एक्कर ऊभ्या उसाला दिं . २=२ २०२२ रोजी दुपारी ४ वाजन्याच्या सुमारास शाॅट सर्किटने आग लागल्याने शेजारचा पण पाच एक्कर ऊस जळून खाक. एकूण आठरा एक्कर ऊभा ऊस जळाला असुन जवळ पासची फळबाग ही होरपळली, गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात महा वितरणच्या हालगर्जीपणा मुळे गावा गावात व शेतकऱ्यांच्या ऊभ्या पीकात विध्युत तारा वर्षाच्या बाराही महिने पंचमीचा झोका खेळल्यागत लोंबतांनाचे चीत्र ठिक ठिकाणी पाहण्यास मिळत असुन शेतकऱ्यांनकडुन व गावक-यांकडुन वारंमवार महावितरणच्या पदाधिका-यांना तोंडी व लेखी निवेदनाव्दारे सांगुन देखील महावितरणचे बे जबाबदार पदाधिकारी व कर्मचारी फक्त वसुलीतच दंग तर बळीराजा आर्थिक तंगीत दिसुन येत आहे.
—-
आम्ही वेळो वेळी महावितरणच्या कर्मचारी व पदाधिका-यांना लोंबकाळणा-या तारा विषयी तोंडी व लेखी कल्पना देऊन देखील दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडली.माझा ऊस जळीत झालेल्या घटनेतुन आर्थिक नुकसानीस सर्वस्वी महावितरणच. जबाबदार आसल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले
आपद्ग्रस्त शेतकरी
भाऊसाहेब गोडबोले
===========
मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींचा सामना करत शेतकरीवर्ग जिवन जगत आहे.त्यात भर म्हणून या वर्षी खरीप पिकांचे नुकसान झाले असून काहीही हाती लागले नाही.वरून MSEB च्या विभागाकडून करण्यात आलेल्या हलगर्जीपणामुळे मिरगावच्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे,त्याची भरपाई देण्यात यावी,त्याच बरोबर अश्या घटना भविष्यात घडु नये यासाठी मा.आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
-प्रा.शाम कुंड तलवाडा


