




✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)
गडचिरोली(दि.4फेब्रुवारी):-जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात वैज्ञानिकांनी कोविड-19 मुळे होणारे मृत्यू यावर अभ्यास केला आहे. त्यातून काही महत्वाचे संकेत मिळाले आहेत. लॉकडाऊन फारसे उपयुक्त ठरत नाही हेही खरे आहे. तरीही शासनाने लाकडाऊन सुरू केले आहे. साथीच्या काळात मृत्यू कमी करण्यासाठी लॉकडाउन प्रभावी उपाय नाही. हे स्पष्ट आहे. लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आणि सामाजिक स्तरावरही विपरित परिणामच झाल्याचं अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामध्ये कोरोना व्हायरसमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लॉकडाऊन फारसे उपयुक्त ठरत नाही. अमेरिका आणि युरोपमध्ये कोविड-19 मुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा प्रभाव कमी किंवा अगदी नसल्यासारखा होता. असे संशोधकांना एका अभ्यासात आढळले आहे.
लॉकडाऊन लावल्यानंतर मृत्युंचे प्रमाण सुमारे केवळ 0.2 टक्क्यांनी कमी झाले आहे का❓अभ्यासात असे निरीक्षण करण्यात आले आहे की, लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत म्हणजेच 20 मे 2020 पर्यंत अमेरिकेत कोविडमुळे 97 हजार 81 जणांचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्यावेळी एका मोठ्या अभ्यासात लॉकडाऊन केला नसता तर 99 हजार 50 मृत्यू झाला असता असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दोन्ही आकड्यांची तुलना केल्यास फारसा फरक दिसून येत नाही. लॉकडाऊन, शाळा बंद, बॉर्डर बंद आणि लोकांच्या भेटण्यावर निर्बंध याचा कोविड-19 च्या मृत्यू दरावर लक्षणीय परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. 2020 मध्ये, महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊन लावल्यानंतर कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण सुमारे 0.2 टक्क्यांनी कमी झाले.




