Home महाराष्ट्र आजादीच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त तलवाडा येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा...

आजादीच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त तलवाडा येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा संपन्न..!

304

🔹डिजिटल आर्थिक साक्षरतेसाठी नाबार्ड व महाराष्ट्र ग्रा.बँक सरसावली

✒️तलवाडा प्रतिनिधि शेख आतिख)

तलवाडा(दि.4फेब्रुवारी);-नाबार्ड व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तलवाडा येथे आर्थिक डिजिटल साक्षरता मोहिमे अंतर्गत ‘ राजमाता जिजाऊ सचिवालयात ‘ आर्थिक साक्षरता मेळावा भरवण्यात आला. या मेळाव्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे तलवाडा शाखा व्यवस्थापक एस.आर. भापकर यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शेतकरी व बँकेच्या ग्राहकांना जीवनातील दैनंदिन आर्थिक व्यवहारात बँकेचे महत्व, डिजिटल व्यवहार व विविध योजना याविषयी जागृत असायला हवे. आर्थिक साक्षरता व त्याची फळे साऱ्यांना चाखायला मिळावी, असे कायम बोलले जाते. मात्र, त्यापेक्षा आवश्यक आर्थिक डिजिटल साक्षरता आहे. ती या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तलवाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विष्णू हात्ते होते.या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ( पिंटू शेठ ) गर्जे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कचरे महाराज, ज्येष्ठ पत्रकार तथा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य बापू गाडेकर, माऊली डोंगरे,अतीख शेख, सचिन डोंगरे, अल्ताफ कुरेशी, सुरेश गांधले, विष्णू राठोड, अशोक सुरासे, मोहन डोंगरे व तलवाडा परिसरातील शेतकरी व बँकेचे ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा मेळावा उत्साहात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहायक व्यवस्थापक सागर ढबाले, सहायक व्यवस्थापक वैभव निलगुडे, कॅशियर अविनाश दरेकर, संदेश वाहक गौतम डोंगरे, नारायण कलाल या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कचरे महाराज, तर आभार सागर ढबाले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here