




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.4फेब्रुवारी):-शिवनगर वार्ड क्रमांक ५ येथे जाण्याकरिता जो मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गाची पूर्णपणे दुरव्यवस्था झालेली आहे आणि तेथील स्थानिक नागरिकांना तिथून जाण्या येण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्या मार्गाची अवस्था बघता तिथे मोठी जीवघेणी दुर्घटना होण्याचे प्रमाण दिसून येत आहे, सोबतच त्या मुख्य मार्गावर पथदिवे नाहीत त्यामुळे रात्री त्या मार्गावरून ये-जा करण्यास शिवनगर येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे
*या विषयाला घेऊन आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा दिनांक २९-०९-२०२१ रोजी नगरपरिषद घुग्घुस कार्यालयात निवेदन देण्यात आले होते.
त्यामुळे आम आदमी पार्टी द्वारा घुग्घुस नगरपरिषदेला आणखी अशी मागणी करण्यात येते की याविषयाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन शिवनगर वार्ड क्रमांक ५ येथील मुख्य मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी व त्या मार्गावर पथदिवे लावण्यात यावे अन्यथा १५ दिवसा मधे आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा पूर्ण शिवनगर वासियांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.
यावेळी आम आदमी पार्टी, घुग्घुस महिला सदस्य उमा टोक्कलवार, पूनम वर्मा,विपश्यना अनुप धनविजय,सोनम शेख,अंजली नगराळे,रूबिया शेख,विजया उपलेट्टी,शिला उपलेट्टी,हसीना शेख,कविता विष्णु भक्त,देविणा नाईकाप,शिला उपलेट्टी,विजया उपलेट्टी,नईमा शेख,देविणा नाईकाप,धम्मदिणा नायडू सोबत,शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, अनुप नळे, सागर बिऱ्हाडे, स्वप्नील आवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…




