Home महाराष्ट्र बेलोना येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ३५ लक्ष ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर...

बेलोना येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ३५ लक्ष ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर !

236

🔹बेलोना गावाची तहान भागणार ; पाणी पुरवठा योजनेला मंजुरात !

🔸बेलोना येथील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.3फेब्रुवारी):-वरुड मोर्शी तालुक्यातील २८ गावांचा जल जीवन मिशन कार्यक्रमामध्ये समावेश करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन मोर्शी वरुड तालुक्यातील गावांना जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जल जीवन मिशनकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे तसेच मोर्शी वरुड तालुक्यातील गावातील योजनांचे प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती यांना देण्यात आले होते.

मोर्शी तालुक्यातील बेलोना येथील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळवण्यास आमदार देवेंद्र भुयार यांना यश आले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून पाणी पुरवठा योजनेच्या या कामाला ३५ लक्ष ४२ हजार रुपयांचा प्रशासकीय मान्यता आदेश २७ जानेवारी रोजी मिळाल्यामुळे आता लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून बेलोना गावाची तहान भागणार आहे.

बेलोना गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता. उन्हाळ्यात तर नेहमी पिण्याचे पाणी ग्रामस्थांना वेळेवर मिळत नव्हते. त्यावेळी नागरिकांची तहान भागविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी बेलोना येथील पाणी पुरवठा योजनेला निधी मिळवून ही योजना कार्यान्वित करू असा बेलोना वासीयांना दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे. या योजनेमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे बेलोना येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here