Home महाराष्ट्र संविधान बदलण्याचे पाऊल म्हणजे दुसरे भीमा कोरेगाव रणसंहार.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

संविधान बदलण्याचे पाऊल म्हणजे दुसरे भीमा कोरेगाव रणसंहार.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

375

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.3फेब्रुवारी):;बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर लिखित “भारतीय संविधाना” वर हा देश चालत आहे, संविधान बदलण्याचे पाऊल म्हणजे दुसरे भीमा कोरेगाव रनसंहार होईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

देशात हिंदुत्ववाचे नाव घेऊन मनुवादी सरकार बनले आहे, यामुळे मनुवाद उफाळला आहे,काही संघटना भारतीय संविधानाला विरोध करत आहेत,ज्या ही कोणी संस्था संघटना असा निर्णय घेत असतील किंवा असा प्रचार करत असतील त्या-त्या संस्था/संघटन व्यक्ती वर देश द्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांच्या संस्थे संघटनेवर कायम स्वरूपी बंदी घालावी असे मत डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले.

राज्यातील सर्वच सरकारने माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान समाविष्ट करावे व विश्वातील सर्वात महान आणि मोठा भारतीय राष्ट्रग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान नव्या पिढीला अवगत करावेत.संविधान बदलत असल्याची चाहूल जरी लागली.तर देशात मोठा विस्फोट होईल,देश अधोगतीला लागेल, फार मोठा रणसंहार होईल आणि त्यास जवाबदार सरकार असेल असेही मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

Previous articleगडचिरोली:- आष्टीत सिंचन विहिर बांधकामाचे भूमिपूजन
Next articleबेलोना येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ३५ लक्ष ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here